गिरनार - गुरुशिखर यात्रा

गरुडेश्वर – नारेश्वर – सोमनाथ सह

पुणे ते पुणे / मुंबई ते मुंबई – ६ दिवस - सहभागी शुल्क -  रु. १६०००/- 

गिरनार- दत्त पादुका + दत्तधुनी

गुरुशिखर – अत्रि – अनसूया दत्त दर्शन + माऊंटअबू

गरुडेश्वर – बोलणारी दत्तमूर्ती + प. प. टेम्ब्येस्वामी समाधी मंदिर

नारेश्वर – दत्तबावनी रचनास्थळ + प. पू. रंगावधूत महाराज समाधी मंदिर

गिरनार यात्रेचे वेळापत्रक:

१) ११ ते १६ ऑक्टोबर २०१८   २) १४ ते १९ नोव्हेंबर २०१८   ३) ६ ते ११ डिसेंबर २०१८

४) २४ ते २९ डिसेंबर २०१८     ५) ७ ते १२ जानेवारी २०१९   ६) २५ ते ३० जानेवारी २०१९

महर्षी वेदव्यासांनी ज्याचा उल्लेख पुराणामध्ये ‘रैवत्गिरी’ असा केला आहे असे गिरनार अतिशय महान दत्तक्षेत्र आहे. गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहराजवळ गिरनार हा पर्वत उभा आहे. गिरनार हे दत्तगुरुंचे सिद्धपीठ आणि अवधूतपीठ आहे. तेथे दत्तप्रभूंनी १२००० हून अधिक वर्षे तपश्चर्या केली आहे. ते परम सिद्धीदाते आहेत, भक्तांच्या कामना पूर्ण करतात, भक्तांना अधार देतात, त्यांचे रक्षन करतात. श्रीदत्तात्रेयांचे गिरनार पर्वतावर अखंड वास्तव्य आहे. गिरनार पर्वतावर मुख्य स्थानी श्रीदत्त पादुका आहेत. त्यांना गुरुपादुका असेही म्हणतात. तेथे जाण्यासाठी ९,९९९ पायऱ्या चढून जावे लागते. प्रत्येक दत्तभक्ताने आयुष्यात एकदातरी गिरनार यात्रा करावी.

या यात्रेमध्ये आपण गिरनार सोबत गुरुशिखर (अबू पर्वत) , गरुडेश्वर – (प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी महाराज समाधी मंदिर), नारेश्वर – (दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष प. पू. रंगावधूत महाराज समाधी मंदिर), आणि सोमनाथ – ( हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. ) या तीर्थ क्षेत्रांचेही दर्शन घेणार आहोत.

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon