नर्मदा परिक्रमा करु इच्छिणाऱ्या किंवा केलेल्या भक्तांचे पोर्टल.

भारत भरातून वर्षाला लाखों लोक नर्मदा परिक्रमा करतात. पायी परिक्रमा करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या अनुभूती येतात. या पोर्टल वर ज्यांनी पायी नर्मदा परिक्रमा केली आहे आणि ज्यांना भविष्यात परिक्रमा करायची इच्छा आहे त्यांनी आपले नाव नोंदवावे. येथे आपले नाव, वय, गाव, मोबाईल आणि ईमेल पोस्ट करावा. नविन व्यक्तींना नर्मदा परिक्रमा करताना एखादी व्यक्ती एकटी असेल आणि सोबत म्हणून कुणी व्यक्ती येथे भेटेल जी त्याच वेळेला नर्मदा परिक्रमा करत आहे. ज्यांनी अगोदर परिक्रमा केली आहे, त्यांनी त्यांचे अनुभव, विशेष प्रसंग, फोटो इतरांशी शेअर करावेत. कुणाला काही प्रश्न असतील तर ते या पोर्टलद्वारे येथे विचारु शकतात.