अन्नदानाचा अत्यंत पवित्र योग...
पून्हा बारा वर्षे असा अन्नदानाचा योग येणार नाही !
कन्यागत महापर्वकाल समाप्ती महाअन्नदान सेवा आणि
कृष्णामाईला दोन्ही तीरावर साडीचोळी अर्पण सोहळा
कन्यागत महापर्वकालाची समाप्ती १२ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी सुर्योदयाला होत आहे, गुरू त्या दिवशी तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. ११ ऑगस्ट १०१६ पासून कृष्णा नदीच्या किनारी सर्वत्र कन्यागत महापर्वकाल हा अत्यंत पुण्यदायी असा महोत्सव सुरू होता. गुरू सिंह राशीत गेला की सिंहस्थ, गुरू कुंभ राशीत गेला की कुंभमेळा अगदी तसेच गुरू कन्या राशीत गेला की कन्यागत महापर्वकाल...
कन्यागत महापर्वकाल समाप्ती निमित्त कृष्णा कोयना प्रीतीसंगमावर म्हणजे श्रीक्षेत्र कराड जि. सातारा येथे कृष्णाबाई घाटावर कन्यागत महापर्वकाल समाप्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने कराड येथे खालील उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळा – दि. ०६ ते १३ सप्टेंबर २०१७ पारायणासाठी मोफत निवास भोजन व्यवस्था – संपर्क : ९४२०४९३५०६
2. कृष्णा नदीला साडी नेसवणे – दि. १२ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ७ वाजता
3. कन्यागत महापर्वकाल समाप्ती सोहळा- दि. १२ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ८ वाजता
कन्यागत समाप्तीवेळी कृष्णा नदीला दोन्ही तीरांवर मिळून साडी-चोळी नेसवण्याचा विहंगम सोहळा आयोजित केला आहे. दोन्ही तीरावर वाहत्या पाण्यावर साडी नेसवणे हा अत्यंत नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि आपले अष्टसात्विक भाव जागृत करणारा विलक्षण अनुभव असतो. त्यावेळी कृष्णामाईची खणा नारळाने ओटी भरण्यात येणार आहे.
वरिल सर्व सोहळयामध्ये भाविक भक्तांनी उपस्थित रहावे अशी प्रार्थना आहे. समाप्ती सोहळ्यानंतर आणि कृष्णा नदीला साडी नेसवल्यानतंर महाअन्नदान भंडारा होणार आहे. यावेळी अन्नदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नदान म्हणून आपण धान्य गहू / तांदूळ / तेलडबा / डाळीचे पोते / गूळ / साखर इ. शिधा द्यावा. तसेच आर्थिक स्वरूपामध्ये रोख रक्कम खालील बॅंक खात्यामध्ये जमा करावी आणि दिलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस अप करून किंवा फोन करून कळवावे ही विनंती.
बॅंक खात्याचा तपशील –
खात्याचे नाव – कराड कन्यागत महोत्सव समिती
बॅंकेचे नाव – कराड अर्बन बॅंक खाते क्रमांक – १००१०१६००६५०३
IFSC कोड – KUCB0488007
कृपया रक्कम भरल्यावर ९४२०४९३५०६ या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवावा.
धान्य / शिधा थेट कराड येथे पाठवावा. संपर्कासाठी खालील क्रमांकावर दूरध्वनी करावा.
कराड कन्यागत महोत्सव समिती कराड
जि. सातारा दूरध्वनी : (०२१६४) २२१९२०
श्री. टिकमदास गांधी – ९४२२७६७१३३
श्री. आनंद परांजपे – ९८९०९४०७४४