संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका:

श्री. मोहन केळकर यांनी स्वतः १२६ दिवसांमध्ये ( ४ महिने आणि ६ दिवस ) पायी नर्मदा परिक्रमा केली. परिक्रमा करताना दररोज नित्य नियमाने दैनंदिनी लिहली. परिक्रमा मार्गातील दोन मुक्कामातील अंतरे, मुक्कामाची ठिकाणे, त्यातील प्रमुख व्यक्तींची नावे, मठ, मंदिरे, आश्रमांची माहिती, तेथिल दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक यांची व्यवस्थित नोंद केली. ती सर्व माहिती तपासून घेतली. त्यांनी हे पुस्तक लिहताना कोणत्याही नविन व्यक्तीला पायी नर्मदा परिक्रमा करायची असेल तर कोणकोणती माहिती आवश्यक आहे याचा सर्वांगिण विचार करुन हे पुस्तक लिहले आहे. परिक्रमा करण्याची इच्छा झालेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढावा, भीती आणि संदेह कमी व्हावा आणि तो करणाऱ्या परिक्रमेचा आराखडा त्याच्या डोळ्यासमोर नीट उभा रहावा अशी काळजी घेतली आहे. त्याच बरोबर त्याच्या कुटुंबियांनाही परिक्रमा मार्ग, लागणारे दिवस आणि मार्गातील मुक्कामाची संभाव्य ठिकाणे आणि तेथिल संपर्क मोबाईल क्रमांक यांची माहिती व्हावी असा उद्देश आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी कमी होऊन त्यांचे संपूर्ण सहकार्य परिक्रमेची इच्छा झालेल्या व्यक्तीला मिळावे अशी लेखकाची प्रामाणिक तळमळ आहे.

पुस्तकामध्ये परिक्रमामार्गातील ठिकाणांची माहिती, दोन मुक्कामाच्या ठिकाणातील अंतर, रोज चालावे लागणारे अंतर, मुक्कामाच्या ठिकाणातील प्रमुख व्यक्तींची नावे, तेथिल दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक, परिक्रमेदरम्यान भोजन प्रसाद स्वरूपामध्ये कुठे मिळते आणि आपल्यालाच कुठे तयार करावे लागते त्याची माहिती, परिक्रमे दरम्यानचे तेथे केले जाणारे धार्मिक विधी, परिक्रमेदरम्यान करायचा रोजचा नित्यपाठ, परिक्रमेसाठी करावी लागणारी तयारी, परिक्रमेसाठी घ्यावी लागणारी परवानगी आणि ओळखपत्र, परिक्रमेचे नियम, परिक्रमेचे प्रकार, इ. अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. सर्वात मुख्य म्हणजे या पुस्तकामध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गाचा विस्तृत नकाशा दिला आहे. आकर्षक मुखपृष्ठ पाहूनच आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. आतील रंगीत आणि कृष्णधवल चित्रे, वाचण्यास मोठा फॉंट आणि पुस्तकाची सुबक मांडणी यामुळे या पुस्तकाची शोभा वाढली आहे.

 

३ दिवसांची नर्मदा परिक्रमा

 • संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी
 • ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांचेसाठी तितकीच पुण्यदायी आणि आनंददायी पर्वणी
 • नर्मदामैय्याचे सान्निध्य आणि कृपा भरभरुन अनुभवायला देणारी दैवी परिक्रमा

Sampoorna Narmada Parikrama Margdarshika + 3 Days Narmada Parikrama

₹510.00 Regular Price
₹349.00Sale Price

  © Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social Icon

  622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  0