श्रीक्षेत्र तिलकवाडा

          गुजरात राज्यामध्ये नर्मदा जिल्ह्यात श्रीक्षेत्र गरुडेश्वरपासून १८ कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र तिलकवाडा हे स्थान आहे. हे ठिकाण अतिशय प्राचीन असून तेथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेले एक पुरातन मारुतीचे मंदिर आहे. त्या ठिकाणी एका दक्षिणेतील यती महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास केला होता. त्यावेळी तिथे रोज नर्मदाखंडाचे आख्यान चालू होते. त्याठिकाणी महाराजांनी कूर्मपूराण लिहून काढले. एका आंध्रलिपितील म्हणजे तेलगू भाषेतील लिपीवरुन महाराजांनी हे कूर्मपुराण लिहिले. तिलकवाडा येथे थोरल्या महाराजांनी अनेक लीला केल्या आहेत. तेथील भाविक मंडळी नित्य महाराजांच्या दर्शनास येत असत. पिशाच्च, संततिप्रतिबंध, नोकरी, प्रकृती अस्वास्थ्य इ. अडचणींवर महाराज उपाय सांगत असत. तिथे मणिशंकर नावाचा एक गृहस्थ महाराजांकडे पत्रिका घेऊन आला आणि आपल्याला संतती का होत नाही असे त्याने विचारले. तेव्हा महाराजांनी सर्पदोषाचे कारण सांगून नागपंचमीव्रत आणि नागबळी करा असे सांगितले. त्यानंतर त्या गृहस्थाला संतती झाली. त्यांनी गोविंदराव करंजगावकर यांना एक मंत्र लिहुन त्याचा जप करायला सांगितला. त्यामुळे त्यांना उत्तम नोकरी प्राप्त झाली. तिलकवाडा हे स्थान अतिशय रमणिय आहे. तेथे नर्मदेचे विस्तृत पात्र असून तेथे ती उत्तरवाहिनी आहे. तेथे केलेली अनुष्ठाने, तप आणि पारायणे विशेष फलदायी आहेत. या ठिकाणी गुरुदेव दत्त मंदिर आहे. तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती यांची कुटी म्हणजे गुरुघर आहे. तेथील एका घरामध्ये थोरल्या महाराजांनी दिलेले पूजेचे भांडे, त्यांची चंदनी गोटी, त्यांच्या चरणांची मृत्तिका आणि त्यांचे वस्त्र जतन करुन ठेवले आहेत. तसेच त्यांच्या हस्ताक्षरात लिहीलेली पत्रेही तिथे पहाता येतात.

          सध्या तेथे स्वामी विष्णूगिरी या नावाचे स्वामी महाराज राहतात. तेथे आधी संपर्क केल्यास राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था होऊ शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्रीगुरुघर, प. प. वासुदेवानंद सरस्वती कुटी

मु. पो. तिलकवाडा जि. नर्मदा, गुजरात.

स्वामी विष्णूगिरी महाराज - ०९९१३४८६१३५

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon