top of page

अन्नदान- द्रौपदीची थाळी : 

         कर्दळीवन सेवा संघातफे अन्नदान भक्ती सेवा म्हणून द्रौपदीची थाळी ” ही अन्नदान सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवे अंतर्गत देशातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अन्नदान करावे आणि ते आवश्यक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावे अशी रचना केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

गोदान गोदत्तक आणि गोसेवा योजना : 

        हिंदू धर्मात गायीला गेली हजारो वर्षे माता आणि देवस्वरुपात मानले गेले आहे. कर्दळीवन सेवा संघाने गोसेवेसाठी ढाकार घ्यायचे ठरवले असून त्यासाठी गोसेवा प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. कर्दळीवन सेवा संघाच्या सहकार्याने पुण्याजवळील मुठा गावाजवळील शेडगेवाडी याठिकाणी गोशाळा श्री. कुबेर पोपटी काका आणि श्री. सीताराम कोंढाळकर यांनी २००९ साली ६ गायींसह गोशाळेची स्थापना केली. आता तेथे २१ गायी आहेत. नुकतेच गोशाळेजवळ सप्त गोमाता मंदिराची सुद्धा स्थापना केली आहे. कर्दळीवन सेवा संघाच्या कार्यालयामध्ये गो उत्पादने आणि गायीचे शुद्ध तूप उपलब्ध आहे. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गोसेवा परिवार : 

      कर्दळीवन सेवा संघाच्या सहकार्याने “ कोंढाळकर गोशाळा ” पूण्यापासून ३० किमी अंतरावर लवासा रोड मुठा गावाजवळ शेडगेवाडी येथे कार्यरत आहे. तिथे सध्या १८ गाई असून तेथेच सप्त गोमाता मंदिराची उभारणी सुरु आहे. याठिकाणी नियमितपणे गोसेवा करण्याची इच्छा अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे. गोसेवा परिवाराची त्यासाठी स्थापना करण्यात येत आहे. दरमहा रु. १०००/- फक्त (एक हजार फक्त) एवढी रक़्कम गोसेवेसाठी देवून कोणालाही या परिवारामध्ये सहभागी होता येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

bottom of page