कर्दळीवन सेवा संघ आयोजित यात्रा / परिक्रमा
दत्त धाम परिक्रमा
४ प्रकारच्या दत्तधाम परिक्रमा - कालावधी ५ दिवस / ४ दिवस / ३ दिवस - जागृत परंतु अपरिचित श्रीदत्त क्षेत्रांचे दर्शन.
पुणे ते पुणे - एसी - पुशबॅक बस प्रवास
नक्षत्रवृक्ष परिक्रमा
नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष हे प्रत्येकाचे जणूकाही देवदूत आहेत. दैवी संरक्षक आहेत, अशी संकल्पना आहे.
नक्षत्रवृक्ष परिक्रमा - नक्षत्र होम आणि ऑरा स्कॅनिंगसह
पुणे ते पुणे - २ दिवस - एसी पुशबॅक बस प्रवास
स्वामीमठ यात्रा
स्वामी मठ यात्रा ही स्वामींच्या शिष्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले, साधना केली, अनुष्ठाने केली आणि हजारो भाविक भक्तांवर कृपा केली त्या मठांची यात्रा आहे.
पुणे ते पुणे - ४ दिवस - एसी पुशबॅक बस प्रवास

विश्वरूपदर्शन पालखी परिक्रमा
[२ ते ४ मे २०२०] दरवर्षी वैशाख पौर्णिमेदिवशी गाणगापूरहून विश्वरुपदर्शन पालखी निघते. या विश्वरुप दर्शन पालखीसोबत परिक्रमा. (अक्कलकोट आणि गाणगापूर दर्शन, गाणगापूर अष्टतीर्थ आणि अभिषेकासहीत)
पुणे ते पुणे - ३ दिवस - एसी पुशबॅक बस प्रवास

आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रा
पंच कैलासमधील पहिले कैलास (भारतीय कैलास)
भगवान भोलेनाथाची अद्भुत अनुभूती
दिल्ली ते दिल्ली - १६ दिवस
श्रीखंड महादेव कैलास यात्रा
पंच कैलासमधील तिसरे कैलास (भारतीय कैलास)
भगवान भोलेनाथाची अद्भुत अनुभूती
दिल्ली ते दिल्ली - १२ दिवस
पंच बदरी यात्रा (पंचप्रयागसह)
बदरीनाथ आणि वृद्ध बदरी, भविष्य बदरी, आदि बदरी, योग बदरी, ध्यान बदरी. पंचप्रयाग - विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग (वाहनाने + पायी चालणे फक्त - ९ किमी)
हरिद्वार ते हरिद्वार - ७ दिवस
३ दिवसांची नर्मदा परिक्रमा
३ दिवसांची उत्तरवाहीनी नर्मदा परिक्रमा - बडोदे, गुजरात जवळ. चैत्र महिन्यातील पुण्यदायी नर्मदा परिक्रमा. ज्यांना १८ दिवसांची किंवा पायी ६ महिन्यांची पूर्ण नर्मदा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी आनंददायी पर्वणी - मार्च आणि एप्रिलमध्ये (पुणे ते पुणे / ठाणे ते ठाणे)
शनी पीठांची परिक्रमा
शनीकृपेची साक्षात प्रचिती देणारी, शनीपीठांची शनी परिक्रमा
शनीची अडीच पीठे : नस्तनपूर, राक्षसभुवन, बीड.
पुणे ते पुणे - २ दिवस - एसी पुशबॅक बस प्रवास
संजीवन समाधी परिक्रमा
दैवी चैतन्यमय स्पंदनाची अतीव आनंद देणारी - योगी सत्पुरुषांच्या संजीवन समाधींची दर्शन घडवणारी परिक्रमा
पुणे ते पुणे - ३ दिवस - एसी पुशबॅक बस प्रवास

स्वर्गारोहिणी यात्रा
स्वर्गारोहिणी - पांडव जिथून स्वर्गाकडे गेले. बद्रीनाथ मंदिरामागे ४० किमी ची हिमालयातील एक अद्भुत यात्रा
हरिद्वार ते हरिद्वार - १० दिवस किंवा बद्रीनाथ ते बद्रीनाथ - ७ दिवस
मणिमहेश कैलास यात्रा
पंच कैलासमधील दुसरे कैलास (भारतीय कैलास)
भगवान भोलेनाथाची अद्भुत अनुभूती
दिल्ली ते दिल्ली - १२ दिवस
पंच केदार यात्रा
५ केदारांचे एकाचवेळी दर्शन - रुद्र्नाथ, तुंगनाथ, कल्पेश्वरनाथ, मदमहेश्वरनाथ, आणि केदारनाथ (एकूण चालणे - १२० किमी)
हरिद्वार ते हरिद्वार - १५ दिवस
कर्दळीवन परिक्रमा
अक्कलकोट स्वामी समर्थांचे प्रकटस्थान - दत्तात्रेयांचे गुप्तस्थान
कर्दळीवनातील आदिवासी लोकांच्या संपामुळे कर्दळीवन परिक्रमा सध्या बंद आहेत. पुन्हा कधी सुरु होतील याबद्दल नक्की माहिती नाही.
पुणे ते पुणे ४ दिवस - रेल्वे + बस