top of page

ऑनलाइन दत्तक्षेत्रे प्रकल्प 

देशविदेशातील ३००हून अधिक दत्तक्षेत्रे ऑनलाईन करणारा प्रकल्प...

श्रीदत्तप्रभूंच्या सेवाकार्यामध्ये सहभागी व्हा... सहयोग द्या.... सहकार्य करा....

लाखो भाविक भक्तांना घरबसल्या दत्तक्षेत्रांचे दर्शन घडवा...

लाखों भक्तांच्या जीवनामध्ये अध्यात्मिक क्रांती घडविणारा “ ऑनलाईन दत्तक्षेत्रे प्रकल्प ”

श्रीदत्त संप्रदाय हा देशातील एक मुख्य धार्मिक आणि आध्यात्मिक संप्रदाय आहे. श्रीदत्तात्रेयांना आद्यगुरू असे संबोधले जाते. श्रीदत्तात्रेय अवताराचे विशेष म्हणजे हा नित्य निरंतर अस्तित्त्वात असलेला एकमात्र अवतार आहे. इतर सर्व अवतार विशिष्ट कार्यासाठी आले आणि ते कार्य समाप्त झाल्यावर समाप्त झाले. मात्र श्रीदत्तात्रेय अवताराचे नित्य आणि चिरंतन अस्तित्त्व आहे. शिवाय ते स्मर्तुगामी आणि स्मरणमात्रे संतुष्ट होणारे आहेत. कलियुगामध्ये दत्त उपासना हीच सर्व प्राणिमात्रांचा एकमात्र आधार आहे, अशी लाखो भाविकांची श्रद्धा आणि अनुभव आहे. देशात आणि विदेशात मिळून ६० कोटीहून अधिक भाविक भक्त दत्त संप्रदायाबरोबर जोडलेले आहेत.

Online Datta Kshetre Prakalp.jpg

दतात्रेयांचे अनेक शिष्य आणि साक्षात दत्तावतारी सत्पुरूषांच्या अद्भूत लीलांमुळे दत्तसंप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, तमिळनाडू, गोवा, उत्तरप्रदेश इ. राज्यांमध्ये दत्त संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे. याचबरोबर नेपाळ, श्रीलंका, इ. देशातही दत्तात्रेयांची मंदिरे आहेत. या दत्तक्षेत्रांमधील ३०० हून अधिक दत्तक्षेत्रे अत्यंत जागृत आणि भक्तांना दैवी आध्यात्मिक अनुभूती देणारी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहेत. मात्र गंमत म्हणजे यातील फक्त नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, शिर्डी, शेगाव, माहूर, गिरनार आणि पीठापूर इ. काही क्षेत्रे प्रकाशात आली आहेत. त्या ठिकाणी भाविक लोक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. मात्र अन्य जागृत दत्तक्षेत्रांची भाविक भक्तांना फारशी माहिती नाही.

ऑनलाईन दत्तक्षेत्रे प्रकल्पांतर्गत देश-विदेशातील ३०० अत्यंत जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांची विस्तृत माहिती डिजिटल तंत्रज्ञानांचा आधार घेऊन लाखो भाविक भक्तांना व्हॉटस अप, यू ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इ. सोशल मीडियाद्वारे नि:शुल्क उपलब्ध करून द्यायची संकल्पना आहे. या दत्तक्षेत्रांची यादी दिलेली आहे. या प्रकल्पा अंतर्गत अपरिचित जागृत दत्तक्षेत्रांच्या ठिकाणी प्रत्यक्ष शूटिंग करून त्याची डॉक्युमेंटरी अर्थात लघुचित्रपट बनवायचा आहे. यामध्ये प्रत्येक दत्त क्षेत्री जाऊन तेथिल माहिती व संदर्भ एकत्रित करून, त्यावर संशोधन करून, तेथिल विश्वस्तांची परवानगी घेऊन, कॅमेरामन, दिग्दर्शक आणि सहकाऱ्यांची टीम घेऊन तिथे राहून शूटिंग करून, त्याचे संकलन करून आणि त्याचा माहितीपट बनवून तो युट्यूबवर प्रकाशित करणे अशी कार्यवाही करीत आहोत. प्रत्येक क्षेत्राची डॉक्युमेंटरी सुमारे ३० ते ४० मिनिटांची असेल. प्रत्येक दत्तक्षेत्रांचे शूटिंग करताना त्याचा इतिहास, माहिती आणि महात्म्य, याबरोबरच तेथे जायचे कसे जवळचे रेल्वे / बस स्टेशन, तेथील निवासाच्या–भक्तनिवास, भोजन प्रसादाच्या व्यवस्था, तेथील दैनंदिन कार्यक्रम, वार्षिक सण उत्सव, तेथिल कन्यापूजन, नर्मदापूजन, माधुकरी, पालखी, दत्त-तुला इ. वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, धार्मिक विधी, अभिषेक, तेथिल ट्रस्ट संस्था यांची माहिती, संपूर्ण पत्ते, संपर्क क्रमांक, वेबसाईट, ई-मेल, मोबाईल क्रमांक, व्हॉटस अप क्रमांक इ. संपूर्ण सविस्तर माहिती डॉक्युमेंटरीमध्ये दिली जाईल. त्याद्वारे भाविक थेट तिथे संपर्क साधून भेट देतील आणि तेथिल दिव्य अनुभूतींचा अनुभव घेतील. त्याद्वारे लाखो भाविकांना आणि सोशल मीडियामुळे विशेषतः युवकांना अपरिचित दत्त क्षेत्रांची माहिती होईल. त्यांच्या जीवनात एका विलक्षण आनंदानुभवाची सुरूवात होईल. त्यांच्यावर साक्षात दत्तप्रभूंची कृपा होईल.

या प्रकल्पाअंतर्गत एका दत्तक्षेत्राची डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी तेथे प्रत्यक्ष जाणे, व्हिडीओ शूटिंग करणे, मुलाखती घेणे, सर्व माहिती संकलित आणि संशोधित करणे,  परिसराचे शुटिंग करणे आणि त्यानंतर एडिटिंग करून त्याची व्यावसायिक पद्धतीने अंतिम डॉक्युमेंटरी तयार करणे आणि ती प्रकाशित करणे यासाठी अंदाजे एक ते दिड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तीनशे दत्तक्षेत्रांसाठी साधारणपणे चार ते पाच कोटी रुपये खर्च येईल. मात्र आम्ही हा प्रकल्प एकच युनिट वापरून सलगपणे करणार असल्याने ३०० दत्तक्षेत्रांसाठी साधारपणे अडीच ते तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प ३ टप्प्यामध्ये करायचा असे आम्ही ठरवले असून साधारण दीड ते दोन वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल.

यापूर्वी कर्दळीवन या क्षेत्राची डॉक्युमेंटरी तयार केली असून देशविदेशातून २५ लाखांहून अधिक भाविक भक्तांनी ती सोशल मीडीया आणि सीडी माध्यमातून पाहिली आहे. त्यातून लाखो भाविकांना अपार आनंद मिळाला आहे. याचबरोबर ३० दत्तक्षेत्रांची माहिती देणाऱ्या मिनी डॉक्युमेंटरी तयार केल्या आहेत. ४० लाखांहून अधिक भक्तांनी त्या पाहिलेल्या आहेत. तसेच जेथून पांडव स्वर्गाकडे गेले त्या बदरीनाथ मंदिरामागच्या स्वर्गारोहिणी क्षेत्राचीही डॉक्युमेंटरी तयार करून सोशल मीडियावर नि:शुल्क उपलब्ध केली आहे.

दत्त क्षेत्रांच्या मिनि डॉक्युमेंटरी व्हिडिओ पहा

स्वर्गारोहिणी डॉक्युमेंटरी पहा

संपूर्ण देशात एक अभूतपूर्व, आध्यात्मिक आणि धार्मिक क्रांती कारायची ताकद ऑनलाईन दत्तक्षेत्रे या संकल्पनेमध्ये आहे. त्याचबरोबर प्राचिन भारतीय वारशाचे ऐतिहासिक दस्तऐवजीकरण करणारा हा प्रकल्प असेल… ज्याप्रमाणे प.प.वासुदेवानंद टेंब्येस्वामी महाराजांनी १२५ वर्षापूर्वी देशातील विविध प्राचिन दत्तक्षेत्रांचा शोध घेवून ती स्थाने भाविक भक्तांसाठी खुली केली, त्याप्रमाणे या प्रकल्पाद्वारे देश विदेशातील ३०० हून अधिक जागृत दत्त क्षेत्रांची करोडो भक्तांना अनुभूती येईल याची खात्री वाटते.  ऑनलाईन दत्तक्षेत्रे प्रोजेक्ट या अभिनव, क्रांतिकारी आणि समाजाभिमुख प्रकल्पाला आपण सर्वतोपरी सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे. त्याद्वारे देशविदेशातील करोडो भाविक भक्तांचे प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद आपल्याला प्राप्त होतील, असा विश्वास वाटतो. विदेशातील दत्त भक्तांनाही यामध्ये सहभागी होता येईल. भारताबहेर विदेशात राहणाऱ्या दत्त भक्तांनाही या उपक्रमाध्ये सहयोग देता येईल. त्या साठी FCRA अंतर्गत देणगी पाठवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे करण्यात आलेली आहे.

 

प्रत्येक क्षेत्राच्या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्या आर्थिक सहकार्याचा उल्लेख केला जाईल. ज्याप्रमाणे भक्तनिवासामध्ये देणगी म्हणून एखाद्या खोलीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाअते. त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रासाठी साधारणपणे ९० हजार रूपये  निधी आवश्यक आहे. एका क्षेत्रासाठी तीन भाविक भक्तांकडून प्रत्येकी रु. ३०,०००/- किंवा दोन भक्तांकडून प्रत्येकी रु. ४५,०००/- किंवा एकाकडून रू. ९०,०००/-  असा सहयोग अपेक्षित आहे. एखादी व्यक्ती किंवा संस्था यांना एकापेक्षा अधिक क्षेत्रांसाठीही सहयोग देता येईल.   

बॅंक खात्याची माहिती 

खात्याचे नाव: कर्दळीवन सेवा संघ

बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे

चालू (Current) खाते क्र.  : 60108955634

IFSC Code: MAHB0000003

विदेशातून रक्कम पाठवण्यासाठी SWIFT कोड : MAHBINBBDGP

 

रक्कम जमा केल्यानंतर त्याची माहिती 9657709678 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी.

 (आपल्या आर्थिक सहयोगासाठी आयकरामध्ये सवलत उपलब्ध नाही.)

संपर्क

कर्दळीवन सेवा संघ - विनायक पाटुकले

मो: ९६५७७०९६७८ / ८९८३७८२१०२

ईमेल: swami@kardaliwan.com

दत्तक्षेत्रांची यादी पहा. यादीमध्ये वाढ होत आहे. आपणही आपल्याला माहित असलेल्या खालील यादी व्यतिरिक्त दत्तक्षेत्राची माहिती आम्हाला कळवू शकता.

bottom of page