top of page
Datt Dham P.jpg

श्रीदत्त परिक्रमा

२७ दत्तक्षेत्रे आणि ४ शक्तिपिठांसह जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे दर्शन

पुणे ते पुणे - एसी स्लीपर कोच बस प्रवास

कर्दळीवन सेवा संघ आयोजित

Shri Datta Parikrama

श्रीदत्त क्षेत्रे
शंकरमहाराज मठ - औदुंबर - अमरापूर - नृसिंहवाडी - पैजारवाडी - कुडूत्री - माणगाव - मुरगोड - बाळेकुंद्री - कुरवपूर - मंथनगोड - पीठापूर - माणिकनगर - बसवकल्याण - कडगंची - लाडचिंचोळी - गाणगापूर - अक्कलकोट - लातूर - माहूर- कारंजा - शेगांव - अनसुया - नारेश्वर - तिलकवाडा - गरुडेश्वर
शक्तीपीठे
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि पिठापूरे

 यात्रेच्या तारखा 
1️⃣ १६ ते २७ जानेवारी २०२३
2️⃣ २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२३
3️⃣ १५ ते २६ फे
ब्रुवारी २०२३

Datt P.png

कलियुगामध्ये सर्वात लाभदायक उन्नती करणारी आणि समस्या निराकरण करणारी देवता म्हणजे श्रीगुरू दत्तात्रेय हे आहेत. केवळ स्मरण केल्याने कोणत्याही उपचारांशिवाय फक्त मनःपूर्वक वंदन केल्यावर प्रसन्न होणारी देवता म्हणजे श्रीदत्तात्रेय हे आहेत. श्रीदत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्तसांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करतात. त्याला बळ देतात. त्याच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात. जगद्गुरू होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे. श्रीदत्तात्रेय हे एक असे दैवत ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे. ते सर्वसमावेशक आहे आणि सर्वांना सामावून घेणारे आहे. त्यांचा समन्वयवादी दृष्टिकोन सामाजिक, नैसर्गिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी साहाय्यकारी आहे. त्यांचे हे विभूतिमत्त्व अत्यंत प्रत्ययकारी आहे.
आपण काही दत्तक्षेत्री यापूर्वी भेट दिली असेल. मात्र एकाच वेळी २७ दत्तक्षेत्रे आणि ४ शक्तिपीठे यांचे दर्शन ही एक निश्चितच पूर्णपणे वेगळी, रोमांचकारी आणि अलौकिक अनुभूती आहे. विविध प्रकारच्या श्रीदत्त पादुकांचे दर्शन, विविध दत्तावतारांची लीला ठिकाणे आणि दत्तक्षेत्रांच्या विविध परंपरांचे आपल्याला या परिक्रमेदरम्यान मनोज्ञ दर्शन होते.
ज्या ज्या ठिकाणी श्रीदत्त क्षेत्रे आहेत, त्या त्या ठिकाणी विलक्षण चैतन्यशक्ती वास करत असतात असा अनुभव आहे. श्रीदत्त क्षेत्रांठिकाणचे वातावरण, निसर्ग आणि परिसर श्रीदत्त अवतार आणि त्यांच्या शिष्यांच्या तपश्चर्येमुळे, वास्तव्यामुळे आणि लीलांमुळे प्रभावित झालेला आहे. तेथे प्रत्यक्ष गेल्यावर लाखो व्यक्तिंना अशा अनुभूती आलेल्या आहेत.

परिक्रमेची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 9657709678 या क्रमांकावर Datta Parikrama असा मेसेज पाठवा.

संपूर्ण माहितीपत्रक आणि नियम-अटी वाचा

नोंदणी कशी करावी ? 

ऑनलाईन नोंदणी

1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा. 

2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.

3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर कळवावे.

4️⃣ नोंदणी पूर्ण झाल्यावर कार्यालयात कॉल करुन बस सिट क्रमांक पक्का करावा.

ऑफलाईन नोंदणी

1️⃣ खालील बटणावर क्लिक करुन नोंदणी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.

2️⃣ अर्ज भरुन, सही करुन आमच्या पत्त्यावर पाठवा आणि रक्कम बॅंकेत जमा करावी. Transaction Details आमच्या 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवावे आणि सिट क्रमांक पक्का करावा.

सहभागी शुल्क : ₹४२०००/- + (5% GST) प्रतिव्यक्ती
(३-४ व्यक्तींना प्रत्येकी ४१०००/- । ५ व्यक्तींना प्रत्येकी ४००००/-)
(नोंदणी करतेवेळी रु. २५०००/- उर्वरित रक्कम परिक्रमेच्या १० दिवस अगोदर)

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

मो: 9371102439 / व्हॉट्सअ‍ॅप: 9657709678 / फोन: 020-25534601

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: wakardaliwan@gmail.com

कार्यालय : कर्दळीवन सेवा संघ - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,

हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

समाविष्ट गोष्टी :
१) एसी स्लिपर कोच बस प्रवास
२) होटेल / भक्त निवास रुम मध्ये राहण्याची व्यवस्था (एका रुममध्ये २ व्यक्ती, काही ठिकाणी ३ व्यक्ती)
३) दोन वेळ चहा, सकाळी नाष्ता, दोन वेळचे जेवण (शाकाहारी)
४) सर्व दत्त क्षेत्रांचे व्यवस्थितपणे, पुरेसा वेळ देऊन दर्शन
५) अनुभवी मार्गदर्शक 
६) प्रत्येक कुटुंबामध्ये ३ पुस्तकांचा संच भेट (दत्त परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन संजीवनी) 

प्रत्येक दत्त क्षेत्रांचे काय महत्त्व, माहात्म्य आहे ?

1.   श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे - अक्कलकोट श्रीस्वामी समर्थांचे परमशिष्य महायोगी श्रीशंकर महाराज समाधी.

2.   औदुंबर - नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची साधना स्थळ

3.   अमरापूर - प्रति काशी, प्राचीन अमरेश्वर मंदिर

4.   नृसिंहवाडी – श्री दत्तात्रेयांची राजधानी

5.   पैजारवाडी - श्रीचिले महाराज समाधी मंदिर

6.   कोल्हापूर – श्री महालक्ष्मी मंदिर

7.   कुडुत्री - प. पू. गुळवणी महाराज यांचे जन्मस्थान

8.   माणगाव - प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान

9.   बाळेकुंद्री - प. पू. पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे समाधी मंदिर

10.  मुरगोड - प. पू. शिव चिदंबर दीक्षित यांचे मूळपीठ, मूळमहाक्षेत्र संस्थान

11.  कुरवपूर - श्रीपाद श्रीवल्लभांचे लीलास्थान

12.  मंथनगुडी - गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि वल्लभेश्वर व्यापारी लीलास्थान

13.  पीठापूर : श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मठिकाण

14.  लाड चिंचोळी - प. पू. श्रीधरस्वामी यांचे जन्मस्थान

15.  कडगंची - गुरुचरित्र येथे लिहिले गेले...

16.  माणिकनगर - प. पू. दत्तावतार माणिकप्रभू यांचे मंदिर

17.  बसवकल्याण - दत्तात्रेयांचा कलियुगाच्या प्रारंभीचा प्राचीन अवतार – भुयार आणि शेषदत्त पादुका

18.  गाणगापूर - नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे लीलास्थान आणि निर्गुण पादुका

19.  अक्कलकोट - श्रीस्वामी समर्थ यांचे समाधी मंदिर

20.  लातूर - श्री सदानंद दत्त मठ आणि निर्गुण पादुका

21.  माहूर - श्रीदत्तात्रेयांचे जन्मस्थान

22.  कारंजा - नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान

23.  शेगाव – श्री गजानन महाराज मंदिर

24. अनसुया – अनसुया आणि अनसुया श्रीदत्त तीर्थ क्षेत्र

25.  नारेश्वर - प. पू. रंगावधूत महाराज समाधी स्थान

26.  तिलकवाडा - प. पू. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे चातुर्मास ठिकाण

27.  गरुडेश्वर - प. पू. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे समाधी मंदिर, नर्मदा नदी किनारी

bottom of page