top of page

नक्षत्रवृक्ष परिक्रमा

(नक्षत्र होम यज्ञासह)

पुणे ते पुणे - २ दिवस - एसी पुशबॅक वाहन प्रवास
सहभागी शुल्क: ४५००/- + GST

पर्यावरण, ज्योतिष्य, खगोल, उपासना आणि अध्यात्म यांची वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती देणारी आगळी वेगळी परिक्रमा 

नक्षत्रवृक्ष परिक्रमेचे वेळापत्रक :

१) २२ ते २३ एप्रिल २०२०   २) १३ ते १४ मे २०२०   ३) २७ ते २८ मे २०२०   ४) ३ ते ४ जून २०२० 

Nakshatra Web.jpg

प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट नक्षत्रावर जन्माला येते. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांची जी स्थिती असते त्यावरून प्रत्येकाचे जन्म नक्षत्र आणि त्याची रास ठरते. त्यावरून त्या व्यक्तीची पत्रिका आणि कुंडली बनवली जाते. गेली शेकडो वर्षे खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा अभ्यास सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीचे एक नक्षत्र असते. त्या नक्षत्रांचा त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडलेला असतो. याचबरोबर प्रत्येक नक्षत्राचा एक वृक्ष असतो. त्याला नक्षत्रवृक्ष असे म्हणतात. ज्या व्यक्तीचे जे नक्षत्र असते त्याचा नक्षत्रवृक्ष हा त्या व्यक्तीचा आराध्यवृक्ष असतो. त्या आराध्य वृक्षामध्ये एक देवता असते. आपल्या नक्षत्रवृक्षाची आणि त्याच्या देवतेची उपासना, पूजन केले तर अत्यंत आश्चर्यकारक अनुभव येतात. माणूस, निसर्ग, आकाश, ब्रह्मांड यांच्यामध्ये एक अतूट असे नाते आहे. त्या नात्याचा विलोभनीय आविष्कार म्हणजे नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष आहेत.

नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष हे प्रत्येकाचे जणूकाही देवदूत आहेत. दैवी संरक्षक आहेत, अशी संकल्पना आहे. ते सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतात. आपली चिंता वहात असतात. त्यांची आपल्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. त्यांना काहीही नको आहे. आपले कल्याण व्हावे एवढाच त्यांचा विचार असतो. आपल्याबद्दल सतत सकारात्मक स्पंदने नक्षत्रवृक्ष आणि देवता प्रक्षेपित करीत असतात आणि नकारात्मक स्पंदनांचे शोषण करीत असतात. वाईट शक्तींचा प्रतिरोध करीत असतात. या वैयक्तिक अनुभूती असून त्या प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून असतात.

नक्षत्रवृक्ष परिक्रमा एक विलक्षण अनुभव आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित कर्दळीवन कर्दळीवन सेवा संघाने नक्षत्रवृक्ष परिक्रमा आयोजित केली आहे.

नोंदणी कशी करावी ? 

● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.
● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा
● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.  

● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.
 

Please share this on WhatsApp & FB

Tags: Nakshatravruksha Parikrama, Nakshatra Hom, Nakshatras, Nakshatra Upasana, Aura Scanning 

bottom of page