संपूर्ण नर्मदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी... 
तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा...

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा

पायी चालणे १८ कि.मी. / वाहनाने सुद्धा करता येते
स्टॅच्यु ऑफ युनिटी सह (सरदार वल्लभभाई पटेल पुतळा) + गरुडेश्वर दर्शन

कालावधी : ३ दिवस - एसी स्लीपर बस प्रवास 

पुणे ते पुणे -  रु. ७५००/- प्रति व्यक्ती

ऑनलाईन बुकिंग करा.
वेळापत्रक (२०२२) : 
१) ८ ते १० एप्रिल (Full) २) १५ ते १७ एप्रिल (Full)
३) २२ ते २४ एप्रिल (Full) ४) २९ एप्रिल ते १ मे (Full)
कार्यक्रम :
दिवस पहिला : पुण्याहून सकाळी ७ वा. निघणे - रात्री ८ वा. गुजरात येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोचणे - मुक्काम
दिवस दुसरा : सकाळी ५ वा. पायी परिक्रमा सुरुवात - दुपारी १ वाजेपर्यंत परिक्रमा समाप्त - कन्या पूजन इ. - सायं. ६ स्टॅच्यु ऑफ युनिटी -  गरुडेश्वर दर्शन मुक्काम 
दिवस तिसरा : सकाळी ६ वा. निघणे - सायंकाळी ४ वा. ठाणे / रात्री ८ वा. पुणे येथे परत.
(विस्तृत कार्यक्रम आणि इतर माहिती नोंदणी केल्यावर परिक्रमा निघण्याआधी ४ दिवस दिली जाते.)

सर्व माहिती, नियम व अटी जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहितीपत्रक वाचावे

तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा...

          गरूडेश्र्वरजवळ गुजरात राज्यात बडोदाजवळील तिलकवाडा ते रामपुरा अशी नर्मदा नदी उत्तर वाहिनी आहे. म्हणजे ती उत्तर दिशेने वाहते. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. वाराणसी (काशी) येथे गंगा नदी वरूण घाटापासून अस्सी घाटापर्यंत उत्तर वाहिनी आहे. म्हणूनच काशी अत्यंत पुण्यदायी आहे. नर्मदापुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये बळी राजाची एक कथा आहे त्यामध्ये जर “उत्तर वाहिनी” नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी साक्षात नर्मदामैय्याने खात्री दिली आहे. 

(यासंदर्भात विस्तृत माहिती प्रा. क्षितिज पाटुकले लिखित “ उत्तर वाहिनी नर्मदा परीक्रमा ” या पुस्तकामध्ये दिली आहे.)

                अधिक माहितीसाठी कर्दळीवन सेवा संघ ६२२, जानकी रघुनाथ, डेक्कन जिमखाना, पुणे- ४११००४ फोन -  9657709678 / 9371102439 ईमेल :- swami@kardaliwan.com यावर संपर्क साधावा.