कर्दळीवन सेवा संघ आयोजित अनोखे आणि कृतिशील
यात्रा परिक्रमा संमेलन
सत्पुरुषांचे आशीर्वचन, परिसंवाद, व्याख्यान, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन
सहभागी शुल्क रु. ४९९/- ( चहा + वर्किंग लंचसह )
सहभागींना पुस्तके ५०% सवलतीत + रु. ५००/- चे परिक्रमा डिस्काउंट कुपन
गेल्या काही वर्षांमध्ये साहसी धार्मिक आध्यात्मिक परिक्रमांमध्ये सर्व वयोगटातील बंधू भगिनी सहभागी होत आहेत. सहभागींमध्ये उच्चशिक्षित युवक युवतींचे प्रमाण खूप आहे. देश विदेशातील हजारो व्यक्ती या परिक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. विशेषत: महिलांचे प्रमाण खूपच वाढत आहे.
कैलास मानसरोवर, कर्दळीन परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, श्रीदत्त यात्रा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, स्वर्गारोहिणी यात्रा, द्रोणगिरी परिक्रमा, गिरनार परिक्रमा, पिठापुर-कुरवपूर परिक्रमा, लाहिरी महाशय राणी खेत गुहा परिक्रमा, पंच कैलास - आदी कैलास, किन्नर कैलास, श्रीखंड कैलास, मणी महेश कैलास, पंच बदरी - बदरिनाथ, वृद्धबदारी, भविष्यबदरी, योगबदरी, ध्यानबदरी, आदी बदरी, पंच केदार - केदारनाथ , कल्पेश्वर, रुद्रनाथ , तुंगनाथ , मदमहेश्र्वर, या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहेत.
बंगलोर, म्हैसूर, उटी, गोवा, काश्मीर, सिमला, कुलू, मनाली, केरळ, व विविध धार्मिक ठिकाणे आता सर्वांना माहीत झाली आहेत. विदेशातही बँकॉक, मलेशिया, थायलंड, युरोप, अमेरिका, इ. टूर्स ला लोक जातात. मात्र आता विकसित जगातील अस्वस्थ आणि असुरक्षित लोक धार्मिक, आध्यात्मिक विषयांकडे वळत आहेत. कर्दळीवन, कैलास, नर्मदा, स्वर्गारोहिणी, गिरनार, दत्त परिक्रमा या चारधाम, काशी, अलाहाबाद, गंगासागर सारख्या फक्त अध्यात्मिक यात्रा नाहीत. यामध्ये साहस आहे. शारीरिक कष्ट आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारची, पूर्णतः वेगळी (अदभुत दैवी अनुभूती) आहे. आधुनिक जगातील बंधूभगिनी देश विदेशातून या साठी उत्सुक आहेत. यासर्व सद्य परिस्थितींचा विचार करून कर्दळीवन सेवा संघाने यात्रा परिक्रमा संमेलन आयोजित केले आहे. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा, परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी त्यातील अनुभवांची देवाण - घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन करावे. तसेच आधिकारी सत्पुरुषांचे दर्शन आणि आशिर्वाद मिळावे, या उद्देशाने हे संमेलन योजले आहे. या विविध नाविण्यपूर्ण परिक्रमांच्या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा संमेलनात होणार आहेत.
आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती, लेखक, परिक्रमार्थी, परिक्रमा आयोजक, सामाजिक कार्यकर्ते असे समाजाच्या अनेक स्तरातील मान्यवर यामध्ये सहभागे होणार आहेत. एकाच ठिकाणी यात्रा परिक्रमांची माहिती, परिक्रमार्थींच्या अनुभवांची देवाण-घेवाण, परिक्रमांचे लघु चित्रपटांमधून दर्शन आणि त्यातून एक उत्कट अनुभूती असे या संमेलनाचे स्वरुप आहे.
साहस + अध्यात्म + धार्मिक परंपरा + पर्यावरण + संस्कृती + समन्वय + लोकजीवन
(Note : Sammelan Registration Fee is Non-Refundable. )
बॅंक खात्याची माहिती
बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे ४११००४ IFS Code MAHB0000003
खात्याचे नाव : कर्दळीवन सेवा संघ खाते क्र. ६०१०८९५५६३४
अधिक माहितीसाठी –
आयोजक - कर्दळीवन सेवा संघ, पुणे
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन, पुणे – ४११००४
व्हॉट्सअॅप : 7057617018
फोन : (०२०) २५५३०३७१/ २५५३४६०१ ईमेल : swami@kardliwan.com
मोबाईल : ९३७११०२४३९ / ९६५७७०९६७८