top of page

संजीवन समाधी परिक्रमा

दैवी चैतन्यमय स्पंदनाची अतीव आनंद देणारी

पुणे ते पुणे - ३ दिवस - एसी पुशबॅक वाहन प्रवास

सहभागी शुल्क: `7500/-  (+GST 5%)

संजीवन समाधी घेतलेल्या योगी पुरुषांची नावे : 

१) हरिचरण गिरी महाराज  २) पूर्णानंद स्वामी महाराज  ३) चिदानंद स्वामी महाराज  ४) विमलानंद स्वामी महाराज  ५) ब्रह्मानंद स्वामी महाराज  ६) महाजन महाराज बैरागी मठ 

७) आनंदनाथ महाराज  ८) श्रीपरशुराम भारती  ९) श्रीदत्त गिरि महाराज 

संजीवन समाधी परिक्रमेचे वेळापत्रक:

१) १७ ते १९ एप्रिल २०२०  २) २२ ते २४ मे २०२०  ३) १० ते १२ जून

03 Sanjivan.jpg

संजीवन समाधी म्हणजे पृथ्वी तत्त्वाबरोबर एकरूप होणे. यामध्ये आपल्या समाधीमध्ये आपण जीवंतपणीच जाऊन बसायचे आणि शिष्यांना बाहेरुन समाधी बंद करुन घ्यायला सांगायचे अशी पद्धती असते. संजीवन समाध्या फारशा आढळत नाहीत. संजीवन समाधीच्या ठिकाणी योगी पुरुषाचे चिरंतन अस्तित्त्व अस्ते अशी श्रद्धा आहे. जणूकाही योगी सत्पुरुष संजीवन समाधीमध्ये नित्य शास्वत वास करुन राहतात असे म्हटले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला आणि गोवा बॉर्डर परिसरामध्ये अशा नऊ संजीवन समाध्या आहेत. त्या अत्यंत दूर आणि आडवाटेला आहेत. ही संजीवन समाधी परिक्रमा आपले अष्टसात्विक भाव जागृत करील. आपल्याला अंतर्मुख करुन एक सर्वार्थाने वेगळी जाणीव निर्माण करील असा विश्वास वाटतो. 

नोंदणी कशी करावी ? 

● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.
● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा
● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.  

● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.
 

Please share this on WhatsApp & FB

Tags: Sanjivan Samadhi Parikrama, Sanjivan Samadhi Darshan 

bottom of page