शनीपीठांची शनी परिक्रमा
शनीकृपेची साक्षात प्रचिती देणारी
पुणे ते पुणे - २ दिवस - एसी पुशबॅक वाहन प्रवास
सहभागी शुल्क: `3999/- (+GST 5%)
शनीची साडेसाती आणि शनीपिडा निवारण्यासाठी प्रत्येकाने शनी परिक्रमा केली पाहिजे...
शनीची अडीच पीठे :
o नस्तनपूर (पूर्ण पीठ) o राक्षसभुवन (पूर्ण पीठ) o बीड (अर्ध पीठ)
शनी परिक्रमेचे वेळापत्रक:
१) १७ ते १८ एप्रिल २) २४ ते २५ एप्रिल ३) ८ ते ९ मे
४) २२ ते २३ मे ५) २९ ते ३० मे ६) ५ ते ६ जून ७) १२ ते १३ जून
अतिप्राचिन काळापासून भारतामध्ये शनीदेवाची ४ मुख्य अतिजागृत तीर्थस्थाने आहेत. त्यांना शनीपीठे असे म्हणतात. या ठिकाणी गेल्या हजारो वर्षांपासून शनीदेवांची पूजा अर्चा अभिषेक आणि विविध उपासना, साधना धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे याठिकाणी शनीदेवांच्या कृपेची विलक्षण अनुभूतीप्राप्त होते. यातील दोन ठिकाणे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वनवास काळात स्थापन केली आहेत. राजा विक्रमादित्याने दोन स्थाने स्थापन केली आहेत. या चार ठिकाणी मिळून शनीची साडेतीन पीठे आहेत.
-
नस्तनपूर – पूर्ण पीठ – प्रभू रामचंद्रांनी स्थापन केले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये आहे.
-
राक्षसभुवन – पूर्ण पीठ – याचीही स्थापना प्रभू रामचंद्रांनी केली आहे. हे बीड जिल्ह्यात आहे. हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आणि विज्ञान गणेश क्षेत्र आहे.
-
बीड – अर्ध पीठ – बीड शहरामध्ये हे स्थान असून राजा विक्रमादित्याने त्याच्या साडेसातीच्या काळामध्ये हे स्थापन केले आहे.
-
उज्जैन – पूर्ण पीठ – मध्य प्रदेशमध्ये इंदूर जवळ उज्जैन राजा विक्रमादित्याने हे मंदिर बांधले आहे. तसेच या ठिकाणी ऋषी मुनींनी तप:श्चर्या केलेली आहे. त्यामुळे येथील वातावरणात विविध प्रकारची दैवी स्पंदने भरुन राहिलेली आहेत.
कर्दळीवन सेवा संघाने यातील तीन पीठांना (अडीच पीठे) जोडणारी शनी परिक्रमा आयोजित केली आहे.
नोंदणी कशी करावी ?
● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.
● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा
● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.
● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअॅपवर पाठवा.
Please share this on WhatsApp & FB
Tags: Shani Parikrma, Shani Sadeteen Pithe, Shani Pith Parikrama, शनी दोष