top of page

स्वामीमठ यात्रा

श्रीस्वामी समर्थ शिष्यांच्या वास्तव्याने, साधनेने आणि अनुष्ठानाने पावन झालेल्या मठांची उत्कट अनुभूती 

पुणे ते पुणे - ४ दिवस - एसी पुशबॅक वाहन प्रवास

सहभागी शुल्क: `9000/- (+GST 5%)

स्वामीमठ यात्रेतील मठ : 

१) शंकर महाराज मठ  २) नांगरगांव  ३) पळसदरी  ४) आपटा  ५) वडघर  ६) चिपळूण  ७) राजापूर  ८) पांगरे  ९) तळगांव  १०) वेंगुर्ला  ११) शिवडाव  १२) प्रयाग चिखली, कोल्हापूर 

स्वामीमठ यात्रेचे वेळापत्रक:

१) १२ ते १५ एप्रिल  २) ७ ते १० मे  ३) २१ ते २४ मे  ४) ४ ते ७ जून

swamimath Page.jpg

श्रीदत्तात्रेयांचे तिसरे अवतार अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ यांची बखर आणि त्यांच्या लीला आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या कृपेने आपले जीवन समृद्ध होण्याच्या कथा आपण वाचलेल्या आहेत. करोडो लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये हा प्रत्यक्ष रोकडा अनुभव घेतलेला आहे. आजही लाखो भाविक भक्तांना स्वामीकृपेची प्रचिती पदोपदी अनुभवायला मिळत आहे. देशात, विदेशात कुठेही जा... कोणत्याही वयोगटातील समूहामध्ये जा...कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील समूहांमध्ये जा... स्वामीकृपेने समृद्ध झालेल्या शेकडो बांधवांची आपली भेट होईल. श्रीस्वामी समर्थ या दत्त अवताराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शेकडो शिष्य हे आहे. त्यांच्या प्रकट काळातच त्यांचे अनेक शिष्य तयार झाले. यामध्ये आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, शंकर महाराज, रामानंद बीडकर महाराज, स्वामीसुत इ. असे अनेक अधिकारी सत्पुरुष होऊन गेले आहेत. या सर्वांवर स्वामींची पूर्ण कृपा होती. आणि त्यांनीही स्वामींप्रमाणेच फार मोठे कार्य आपापल्या परिसरामध्ये केलेले आहे. सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे स्वामींनी देह ठेवल्यावरही पुढच्या काळामध्ये अनेक स्वामी शिष्य झाले आहेत. स्वामींसमोर पूर्णतः शरणागती पत्करून त्यांनीही फार मोठे अलौकिक कार्य केले आहे.

स्वामी मठ यात्रा ही स्वामींच्या शिष्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले, साधना केली, अनुष्ठाने केली आणि हजारो भाविक भक्तांवर कृपा केली त्या मठांची यात्रा आहे. या अहेतूक कृपेचा वर्षाव करणार्‍या स्वामी मठांच्या क्षेत्री आपल्याला अपूर्व आनंदाचा अनुभव येतो. आपण निस्तब्ध होतो. आपल्या जाणीवा समृद्ध होतात. आपल्या संवेदना ताजातवान्या होतात. मनाच्या खोल गाभार्‍यामध्ये एका वेगळ्या आनंदाची पालवी फुटते आणि आपले चित्त प्रफुल्लित होते. अष्टसात्विक भाव जागृत होतात. जीवनाला कलाटणी देणारी ही स्वामी मठ यात्रा प्रत्येकाला अपार आनंद देऊन जाते.

नोंदणी कशी करावी ? 

● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.
● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा
● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.  

● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.

Please share this on WhatsApp & FB

Tags: Swami Math Yatra, Swami Samarth Math in Pune, Swami Samarth Math in Mumbai, Datta Yatra

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

bottom of page