विश्वरुपदर्शन पालखी परिक्रमा
कलियुगातील एकमेव
२ ते ४ मे २०२०
पुणे ते पुणे - ३ दिवस - एसी पुशबॅक वाहन प्रवास
विश्वरुप दर्शन प्रसंगाची आठवण म्हणून वैशाख शुद्ध दशमीला पहाटे काकड आरती झाल्यावर गाणगापूर येथून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पालखी सर्व लवाजम्यासह मिरवणुकीने निघते आणि त्रिविक्रम भारती यांच्या गावी जाते. यालाच विश्वरुप दर्शन परिक्रमा असे म्हणतात. माध्यान्य काळी दुपारी १२ च्या सुमारास तेथे पालखी पोहोचते. महाप्रसाद होतो. विविध सेवा सादर होतात. संगीत सेवाही होते. त्यानंतर स्वामी पुन्हा गाणगापूर येथे येतात. विश्वरुप पालखी परिक्रमा सुमारे १८ किमी एवढे अंतर पायी कापून होते. परत येताना वाहनाने परत येतात. पालखी परिक्रमेचा अनुभव अद्भुत आणि अविस्मरणीय असतो. पालखी बरोबर आपल्याला चालावे लागते. पालखीला स्पर्श करता येतो. पालखी खांद्यावर घेता येते.
कर्दळीवन सेवा संघाने प्रथमच विश्वरुप पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. ही एक वेगळी परिक्रमा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालत करावी. इतरांनी वाहनाने जावे. प्रत्येक दत्तभक्ताने, स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी विश्वरुप दर्शन पालखी परिक्रमेची अनुभूती घ्यावी.
नोंदणी कशी करावी ?
● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.
● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा
● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.
● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअॅपवर पाठवा.
Please share this on WhatsApp & FB
Tags: Vishwaroop Darshan, vishwaroop Darshan Palakhi, Ganagapur Darshan, Ganagapur Palakhi, Kumasi