Search

पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम

हा संदेश तुमच्या जीवनात क्रांती घडवेल...तुमचा खराखुरा विकास होईल...


ऑनलाईन / पत्राद्वारे दासबोध निःशुल्क अभ्यासक्रम - २०२० साठी प्रवेश सुरू - घरबसल्या करता येणारा मराठीतून अभ्यासक्रम


वयोमर्यादा : १८ पासून पुढे

सर्वांना मुक्त प्रवेश
प्रत्येक युवक युवतीने केलाच पाहिजे असा अभ्यासक्रम - याचे प्रमाणपत्र मिळते - तुमचा बायो डाटा ही चांगला बनेल...

एकाच वेळी प्रपंच आणि परमार्थ कसा यशस्वी करावा, याचे व्यावहारिक मार्गदर्शन करणारा दासबोध हा एक अत्यंत सोपा तितकाच अद्वितीय ग्रंथ आहे. संपूर्ण जीवनाचे सार त्यामध्ये सांगितले आहे. कोणत्याही व्यक्तीला आजही अगदी सहजपणे आचरणात आणता येईल, अशा साध्या- सोप्या गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत.


आपल्या जीवनातील अनेक समस्या आणि संकटे यामुळे दूर होतील. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. एक उदात्त दृष्टिकोन प्राप्त होईल. कोणत्याही वयोगटाचे बंधू- भगिनी हा अभ्यास करू शकतात. या अभ्यासक्रमासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे. कोणतीही अट नाही.


'श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड ' यांच्या वतीने हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रम ऑनलाईनही करता येतो.


यामध्ये प्रवेश, प्रबोध आणि परिचय असे तीन वर्षांचे स्तर आहेत. तीन वर्षांसाठी तीन पुस्तके आहेत. दरवर्षी एक पुस्तक आहे. त्यामध्ये १२ प्रकरणे असतात आणि १२ प्रश्न दिलेले असतात. दरमहा एका प्रकरणाचा अभ्यास करून उत्तर पोष्टाद्वारे किंवा ई-मेलद्वारे पाठवायचे असते. पहिल्या वर्षी दासबोध प्रवेश, दुसऱ्या वर्षी दासबोध परिचय आणि तिसऱ्या वर्षी दासबोध प्रबोध अशा प्रकारे हा अभ्यासक्रम चालतो. दासबोधावर संपूर्ण विश्वात विशेषतः जर्मनी, अमेरिका, रशिया, चीन इ. देशांत संशोधन सुरू आहे.


ज्यांनी तरुणपणीच वयाच्या चाळीशीपूर्वी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनी आयुष्यामध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. तरुण वयातच हा अभ्यासक्रम पूर्ण करावा. आतापर्यंत काही लाख लोकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.


या अभ्यासक्रमाची पुण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये केंद्रे आहेत. उदा. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, लातूर, सोलापूर, नागपूर, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ इ.


सर्व समाजांतील, सर्व स्तरांतील सर्वांनी हा अभ्यासक्रम करावा आणि एक अत्युच्च अनुभव घ्यावा, ही सर्वांना मनःपूर्वक प्रार्थना...


I I मिळमिळीत अवघे सोडोनी द्यावे lI भव्य दिव्य तेचि करावे II


या उक्तीप्रमाणे जीवनात खरा पुरुषार्थ गाजविण्यासाठी पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम पूर्ण करावा... आपल्या जीवनाला एक परिसस्पर्श होईल, कैवल्याचा स्पर्श होईल; याची खात्री बाळगावी.


मी हा अभ्यासक्रम वयाच्या पंचविशीतच पूर्ण केला. त्यामुळे मला जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी करता आल्या. या अभ्यासक्रमामुळे माझ्या सद्गुरूंची - डॉ. श्रीकृष्ण देशमुख, मूरगुड, ता. कागल जि. कोल्हापूर - यांची भेट झाली... साक्षात कृपा झाली आणि जीवन आनंदरूप झाले... सुखरूप झाले...


प्रा. क्षितिज पाटूकले - कर्दळीवन सेवा संघ, पुणे.


संपर्क : पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम, श्रीसमर्थ सोसायटी, धन्वंतरी सभागृहाजवळ, पटवर्धन बाग, एरंडवणा, कोथरूड, पुणे – ४११०३८

मोबाईल/व्हॉटसअप - ८६६९४०५९७१


फोन (०२०) २५४१२३२८


ई मेल - dasbodhabhyas@gmail.com


संकेतस्थळ

www.dasbodhabhyas.org


मुंबई - संतोष सप्रे - 9975132234

ठाणे - सौ.नीलम जोशी - 9850829934

नागपूर - रमेश फडके - 9850070434

गोवा - सुरेश तळवलीकर - 8208288641

ऑनलाईन आणि विदेश साठी - सुहास क्षीरसागर - 9881476020


कृपया हा संदेश अधिकाधिक बंधू-भगिनींना पुढे पाठवावा ही विनंती.


#Dasbodh #Sajjangad

271 views0 comments

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

0